येत्या २६ ऑक्टोबर रोजी हलगा येथील विधानसौधात मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या ऊसदर निश्चितीच्या बैठकीत उसाचा दर अंतिम करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे नेते शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. मात्र, जिल्हाधिकारी कित्तूर उत्सवाच्या कामात व्यस्त असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यानंतर शेतकरी नेत्यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या मागण्या मांडल्या आणि जिल्हाधिकारी कार्यालयातून निघून गेले.

२६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बैठकीत उसाच्या दराबाबत अंतिम निर्णय घेण्यात यावा आणि शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्याच्या दृष्टीने सरकारने आपली स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी नेत्यांनी केली.
यावेळी शेतकरी नेते संदीप चलवादी यांच्यासह अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments