Belagavi

विभागीय दसरा जलतरण स्पर्धेत बेळगाव संघाला सर्वसाधारण अजिंक्यपद

Share

युवक सक्षमीकरण आणि क्रीडा खात्यातर्फे बेळगावातील गोवावेस येथील महानगरपालिका जलतरण तलावात आयोजित विभागीय दसरा जलतरण स्पर्धेत बेळगाव संघाने चमकदार कामगिरी करत सर्वसाधारण अजिंक्यपद पटकावले.

या स्पर्धेत बेळगाव, धारवाड, विजापूर, गदग, हावेरी, कारवार आणि बागलकोट जिल्ह्यातील जलतरणपटूंनी भाग घेतला होता.

पुरुषांच्या विभागात तनुज सिंग आणि महिलांच्या विभागात वेदा खानोलकर यांनी प्रत्येकी ५ सुवर्णपदकांची कमाई करत वैयक्तिक चॅम्पियनशिपवर आपले नाव कोरले.

याशिवाय अमन सुनगार, आरोही अवस्थी, साक्षी शिरळी, सायली, सृष्टी, शर्मिष्ठा आणि दर्शन वरूर या जलतरणपटूंनीही उत्कृष्ट कामगिरी करत पदकांची लूट केली.

विजेते जलतरणपटू ११ ते १४ ऑक्टोबर दरम्यान म्हैसूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ‘दसरा सीएम कप’ स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. क्रीडा खात्याचे उपसंचालक श्रीनिवास यांच्या हस्ते विजेत्यांना पदके व चषक देऊन गौरवण्यात आले. या यशात ‘आबा हिंद क्लब’चे प्रशिक्षक विश्वास पवार आणि पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.

Tags: