हुक्केरी येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या १३८ व्या जयंतीनिमित्त सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार समारंभ पार पडला. समाज सुदृढ होण्यात शिक्षकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन हुक्केरी हिरेमठचे चंद्रशेखर महास्वामीजी यांनी केले.

तालुक्यातील बडकुंद्री होळम्मा मंदिर प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हिरेमठच्या चंद्रशेखर महास्वामीजींच्या उपस्थितीत तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी डी. आर. मल्काडद यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

प्रस्ताविकात गट शिक्षण अधिकारी प्रभावती पाटील यांनी डॉ. राधाकृष्णन यांचे आदर्श अंगीकारून उत्तम समाज घडवणे हे प्रत्येक शिक्षकाचे कर्तव्य असल्याचे सांगितले.

कार्यक्रमात वर्ष २०२५-२६ मध्ये नवनिवृत्त झालेल्या शिक्षकांचा तसेच दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकाल देणाऱ्या शाळांच्या मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला.

शिक्षकांना मार्गदर्शन करताना महास्वामीजींनी मुलांच्या घडणीत आई, वडील आणि गुरूंचे मार्गदर्शन आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.

या प्रसंगी चिक्कोडी डाएटचे प्राचार्य जे. पी. तंगडी, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे खासगी सचिव जंगलीसहेबा नायक, अविनाश होळेप्पगोळ, ए. एस. पद्मन्नवर, मलगाौडा, एच. एल. पूजार, नोडल अधिकारी एम. डी. बडीगेर यांच्यासह शिक्षण खात्यातील अधिकारी, विविध शाळांचे मुख्याध्यापक आणि सेवानिवृत्त शिक्षक उपस्थित होते.
* राजू बागलकोटी, इन न्यूज, हुक्केरी.



Recent Comments