विजापूरच्या राजकीय वर्तुळात काँग्रेस नेते व मंत्री एम. बी. पाटील यांच्याशी गुप्त राजकीय तडजोड केल्याच्या आरोपावरून भाजपचे ज्येष्ठ नेते विजूगौडा पाटील आणि आमदार बसणगौडा पाटील यत्नाळ यांच्यातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा पेटला आहे.


अरकेरी येथील प्रसिद्ध श्री अमोघसिद्धेश्वर मंदिरात समर्थकांसह पोहोचलेल्या विजूगौडा पाटील यांनी देवाच्या सानिध्यात पवित्र भंडारा हातात घेऊन, ‘मी बबलेश्वर विधानसभा निवडणुकीत एम. बी. पाटील यांच्याशी कोणतीही छुपी राजकीय तडजोड केलेली नाही’ अशी शपथ घेतली. यत्नाळ यांच्या बिनबुडाच्या आरोपांमुळे माझ्या प्रतिमेला धक्का बसला असून, मी जर खरोखरच राजकीय सौदा केला असता तर मला निवडणुकीत ८० हजारांहून अधिक मते मिळाली नसती, अशा शब्दांत त्यांनी यत्नाळ यांच्यावर पलटवार केला.

आमदारांच्या आरोपांना थेट देवाच्या मंदिरात जाऊन शपथेने उत्तर दिल्याने विजापूर जिल्ह्यातील भाजपमधील राजकीय समीकरणे आणि अंतर्गत कलह आता चांगलाच तापला आहे.
विजयकुमार सारवाड
इन न्यूज
विजापूर


Recent Comments