विजापूर जिल्ह्यातील देवरहिप्परगी तालुक्यातील जालावाद गावात रात्री घरासमोरील कट्ट्यावर झोपलेला असताना तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आल्याची अत्यंत भयंकर घटना घडली आहे.

गावातील इसाक बागवान (२५) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असल्याचे समोर आले आहे. मृत तरुणाच्या कुटुंबाचा आक्रोश मुळापासून हादरवून टाकणारा होता.

घटनेसंदर्भात देवरहिप्परगी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. हत्येचे कारण आणि आरोपींच्या संदर्भात पोलिसांनी तपास हाती घेतला आहे.


Recent Comments