Vijayapura

विजापूरमध्ये शेती आणि वारकरी संस्कृतीवर आधारित गौरी-गणपतीची आरास

Share

विजापूर शहरातील सोलापूर राष्ट्रीय महामार्गाजवळील भवानी नगर येथील अमृता श्रीधर जाधव यांच्या घरी गौरी-गणेशोत्सवानिमित्त प्रतिष्ठापना केलेल्या श्री गणपती समोर ग्रामीण संकल्पनेवर आधारित सुंदर आरास करण्यात आली आहे.

भाद्रपद सप्तमीला शुभ मुहूर्तावर श्री गौरी-महालक्ष्मी आणि गणपतीचे पूजन करण्यात आले. पारंपरिक पद्धतीने आरती करून ज्वारीची भाकरी, पालेभाजी आणि अन्न-प्रसादाचा नैवेद्य दाखवण्यात आला. आरासमध्ये शेती, उगवलेली पिके, गुरांचा गोठा, विहीर आणि वारकऱ्यांच्या दिंडीची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. विविध कलाकृती आणि पारंपरिक फराळाचा नैवेद्य अर्पण करून महिलांना वाण देण्यात आले.

Tags: