बसवेश्वरांचे तत्त्वज्ञान आणि विचार आजही जागतिक पातळीवर अत्यंत प्रासंगिक आहेत, असे प्रतिपादन निवृत्त प्राध्यापिका राजनंदा गार्गी यांनी केले. बेळगाव येथील जागतिक लिंगायत महासभा जिल्हा घटकातर्फे आयोजित मासिक शिवानुभव गोष्ठीत त्या बोलत होत्या.


बेळगाव येथील महांतेश नगरमधील महांत भवनात जागतिक लिंगायत महासभेतर्फे मासिक शिवानुभव गोष्ठीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला डॉ. अल्लमप्रभू महास्वामीजींची उपस्थिती लाभली होती. जागतिक लिंगायत महासभा बेळगावचे अध्यक्ष ॲड. बसवराज रोट्टी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर एस. जी. सिद्याळ यांनी प्रसादाची सोय केली होती.

कार्यक्रमात निवृत्त प्राध्यापिका राजनंदा गार्गी यांनी ‘जागतिक पातळीवर बसवेश्वरांच्या तत्त्वज्ञानाची प्रासंगिकता’ या विषयावर विचार मांडले. १२ व्या शतकात बसवेश्वरांनी केवळ धार्मिक सुधारणाच नव्हे, तर सामाजिक न्याय, समता, मानवी प्रतिष्ठा, महिला सबलीकरण आणि कष्टाचे महत्त्व या वैश्विक मूल्यांचा प्रचार केला. कायकवे कैलास या विचारातून कष्टाला प्रतिष्ठा, दासोह भावना आणि अनुभवा मंटपाच्या माध्यमातून मुक्त विचारसरणी बसवेश्वरांनी दिली, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात डॉ. अडिवेप्पा इटगी यांनी प्रास्ताविक केले. बसवेश्वर बँकेच्या अध्यक्षा सरला हेरेकर आणि कावेरी खिलारी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. भाग्यश्री बेणचनमरडी यांनी आभार मानले, तर सी. एम. बुदीहाळ यांनी सूत्रसंचालन केले.


Recent Comments