Belagavi

भाजपनेते बेरोजगार; जनता त्यांना माफ करणार नाही

Share

राज्यात पूरपरिस्थिती आणि सार्वजनिक समस्या गंभीर असताना भाजप नेते केवळ राजकारणात गुंतले आहेत, असा घणाघाती आरोप माजी मंत्री व बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केला आहे. भाजप नेते पूर्णपणे ‘बेरोजगार’ झाले असून कामाशिवाय पदयात्रा काढत आहेत, त्यामुळे जनता त्यांना कधीही माफ करणार नाही, असा टोला त्यांनी लगावला.

बेळगाव ग्रामीण मतदारसंघात आयोजित ‘जनता दरबार’ कार्यक्रमात आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी नागरिकांच्या समस्या व तक्रारी जाणून घेतल्या. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.

राज्यातील गंभीर समस्यांवर चर्चा सोडून भाजप नेते केवळ राजकीय लाभ उठवण्यात व्यस्त आहेत. राजीनामे दिल्यानंतरही पदयात्रा काढली जात आहे, यावरून भाजप नेत्यांकडे कोणतेही काम उरलेले नसून ते कर्नाटकात निष्क्रिय आणि बेरोजगार झाले आहेत. राज्यातील पूरपरिस्थितीवर चर्चा करण्यासाठी सरकार विशेष अधिवेशन बोलावण्याचा विचार करत आहे. मात्र, तेथेही भाजप नेत्यांनी राजकारण केल्यास राज्यातील जनता त्यांना धडा शिकवेल, असा इशारा माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिला.

Tags: