उगारमधील ‘द उगार शुगर वर्क्स’ या साखर कारखान्याच्या कामगार जिमखान्याची ८४ वी वार्षिक सभा उगार येथील विहार सभागृहात पार पडली.

शिरगावकर कुटुंबाच्या सहकार्याने कामगारांसाठी कार्यरत असलेल्या या जिमखान्याच्या माध्यमातून वर्षभर विविध सांस्कृतिक, क्रीडा आणि शारीरिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. साखर कारखान्याचे जनरल मॅनेजर आर. एन. सिद्धान्ती यांनी सभेचे अध्यक्षस्थान भूषवले. कारखान्याच्या आणि कामगारांच्या विकासात दिवंगत राजाभाऊ शिरगावकर यांचे योगदान मोठे होते, असे त्यांनी सांगितले.

या सभेत चालू वर्षासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये जनरल सेक्रेटरी म्हणून एन. एन. पतकी, जॉइंट जनरल सेक्रेटरी म्हणून एस. व्ही. भट तर कार्यकारिणी सदस्य म्हणून के. बी. शिवगुणसी आणि सी. ए. गणेशवाडी, क्रीडा विभागासाठी बी. ए. मगदूम, ग्रंथालय विभागासाठी आर. वाय. सिरगनवर, मायनर गेम्ससाठी एस. बी. पागे, देशी खेळांसाठी जे. ए. देवमोरे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी पी. ए. पाटील, आर. ए. हौटी व पी. पी. कुलकर्णी यांची निवड झाली. उगार जिमखान्याचे अध्यक्ष म्हणून एम. डी. चंदन शिरगावकर हे कामकाज पाहत आहेत.
सभेच्या सुरुवातीला उद्योजक दिवंगत राजाभाऊ शिरगावकर तसेच गतवर्षात निधन झालेल्या कामगारांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सभेचे वृत्तांत वाचन डी. व्ही. पाटील यांनी केले, तर पी. ए. आतरकर यांनी आभार मानले. सभेत कामगारांसाठी लकी ड्रॉचे आयोजनही करण्यात आले होते.


Recent Comments