Khanapur

खानापूरमध्ये हक्कीपिक्की समाजाने साजरा केला स्वातंत्र्यदिन

Share

खानापूर तालुक्यातील हत्तरगुंजी परिसरातील हक्कीपिक्की आदिवासी बांधवांनी एकत्र येत अनोख्या पद्धतीने ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा केला.

यावेळी महिला, लहान मुले आणि तरुणांनी एकत्र येत स्वातंत्र्यदिन साजरा करत मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. आदिवासी समाजातील मुलांनी उत्तम शिक्षण घेऊन पुढे यावे आणि तरुणांनी स्वयंरोजगार निर्माण करून स्वाभिमानाने जगावे, असे आवाहन दलित संघर्ष समितीचे जिल्हा सरचिटणीस राजशेखर हिंडळगी यांनी केले.

या कार्यक्रमास तालुका अध्यक्ष राघवेंद्र चलवादी, ग्रामपंचायत सदस्य रवी मादर, मारुती कांबळे, दयानंद हक्कीपिक्की, कुमार आदिवासी, वाणीश्री आदिवासी, सोनू हक्कीपिक्की, नवरत्न आदिवासी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Tags: