हुबळी-धारवाड शहरात जलद वाहतूक सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या बीआरटीएस ‘चिगरी’ बसचा अपघात झाला असून, चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पदपथावर घुसली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

धारवाड येथील अंजुमन संस्थेच्या जवळील एचडी बीआरटीएस टर्मिनल्सवरून हुबळीच्या दिशेने जाणारी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट पदपथावर गेली. यात एका दुचाकीचे आणि रस्त्यावरील एका विक्रेत्याच्या गाड्याचे नुकसान झाले आहे.

काही दिवसांपूर्वीच नवलूरजवळ चिगरी बसच्या धडकेत दोन तरुणी जखमी झाल्या होत्या. या घटनेनंतर नागरिकांनी बस अडवून आंदोलन केले होते. ही घटना ताजी असतानाच धारवाडमध्ये पुन्हा असा अपघात घडल्याने स्थानिक नागरिकांनी बीआरटीएस चालकांच्या निष्काळजीपणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. घटनेची माहिती मिळताच धारवाड वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.


Recent Comments