Vijayapura

इंडिचे आमदार यशवंतरायगौडा पाटील यांनी राजीनामा घेतला मागे; राजकीय वादावर पडदा!

Share

मंत्रिपद न मिळाल्याने नाराज होऊन आमदारकीचा राजीनामा दिलेले विजयपूर जिल्ह्यातील इंडि मतदारसंघाचे काँग्रेस आमदार यशवंतरायगौडा पाटील यांनी आपला राजीनामा मागे घेतला आहे.

दोन दिवसांपूर्वी मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज होऊन त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा सादर केला होता, मात्र आता त्यांनी आपला निर्णय मागे घेतला आहे. “काही अपरिहार्य कारणांमुळे मी आमदारकीचा राजीनामा दिला होता. आता मी तो राजीनामा मागे घेत आहे,” असे यशवंतरायगौडा पाटील यांनी स्पष्ट केले.

यासंदर्भात विधानसभा सचिवांना पत्र लिहून त्यांनी, “मी सादर केलेला राजीनामा मागे घेत असल्याचे या पत्राद्वारे कळवत आहे,” असे नमूद केले आहे. यशवंतरायगौडा पाटील यांच्या या निर्णयामुळे इंडि मतदारसंघात निर्माण झालेली राजकीय अनिश्चितता संपुष्टात आली असून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Tags: