Uncategorized

राज्यस्तरीय ज्युनिअर जलतरण स्पर्धेत बेळगावच्या खेळाडूंची दैदीप्यमान कामगिरी

Share

कर्नाटक स्विमिंग असोसिएशनच्या वतीने बेंगळुरू येथील बसवनगुडी कॉर्पोरेशन स्विमिंग पूल येथे आयोजित एनआरजे राज्यस्तरीय ज्युनिअर जलतरण स्पर्धेत ‘स्विमर्स क्लब बेळगाव’च्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे.

बेंगळुरू येथे १३ ते १६ जुलै या कालावधीत पार पडलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यभरातून १ हजारांहून अधिक उत्कृष्ट जलतरणपटू सहभागी झाले होते. या स्पर्धेत बेळगावच्या जलतरणपटूंनी ४ सुवर्ण, ८ रौप्य आणि ३ कांस्य अशा एकूण १५ पदकांची कमाई केली. यात बेळगावच्या अमन सुणगार याने २ सुवर्ण, ३ रौप्य व २ कांस्यपदके मिळवली. निधी कुलकर्णी हिने १ सुवर्ण, २ रौप्य व १ कांस्यपदक पटकावले. समृद्धी हळकारे हिने १ सुवर्ण व २ रौप्यपदके जिंकली, तर धवल हणमन्नावर याने १ रौप्यपदक मिळवून संघाच्या यशामध्ये महत्त्वाचे योगदान दिले. या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर अमन सुणगार आणि समृद्धी हळकारे यांची भुवनेश्वर (ओडिशा) येथे १८ ते २३ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय ज्युनिअर जलतरण स्पर्धेसाठी कर्नाटक संघात निवड झाली आहे.

हे सर्व जलतरणपटू बेळगाव येथील सुवर्ण जेएनएमसी ऑलिम्पिक साईज स्विमिंग पूल येथे मुख्य मार्गदर्शक उमेश कलघटगी तसेच प्रशिक्षक अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, नितीश कुडचकर आणि गोवर्धन काकतकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत. खेळाडूंच्या या यशाबद्दल केएलई सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, जयभारत फाउंडेशनचे अध्यक्ष जयंत हुंबरवाडी, अविनाश पोतदार, माणेक कापाडिया, लता कित्तूर, सुधीर कुसाणे, प्रसाद तेंडोलकर व क्रीडाप्रेमींनी अभिनंदन केले आहे.

Tags: