बेळगाव तालुक्यातील निंग्यानट्टी गावामध्ये जमीन वाटपाच्या कारणावरून दोन कुटुंबांमध्ये वाद होऊन एका महिलेसह तिच्या तीन मुलींवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे.

गावातील सहा एकर जमिनीच्या वाटपावरून दोन पक्षांमध्ये वाद सुरू होता. हा वाद अचानक वाढल्याने त्याचे रूपांतर मारहाणीत झाले. या घटनेत परव्वा चौलगी, मंजुळा हिट्टनगी, सारिका नाईक आणि राधिका चौलगी या चार महिला जखमी झाल्या आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जमीन आमचीच आहे, असे विचारल्यामुळे हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप जखमींनी केला आहे. याप्रकरणी हनुमंत चौलगी आणि त्यांचा मुलगा सचिन चौलगी यांच्यावर मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी काकती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.


Recent Comments