बेळगाव महानगरपालिकेत बळजबरीने कर्नाटक धार्जिणा ठराव मंजूर करून घेण्यासाठी कन्नड संघटनांनी दबावतंत्राचा वापर सुरू करत आता नागनूर रुद्राक्षी मठाचे अल्लमप्रभू स्वामीजी यांची भेट घेऊन या वादग्रस्त मागणीला पाठिंबा देण्याची विनंती केली आहे.

या बैठकीत कन्नड कार्यकर्ते अशोक चंदरगी आणि श्रीनिवास ताळूकर यांनी महानगरपालिकेत ठराव मंजूर करण्यास लोकप्रतिनिधींवर दबाव आणण्याचा खटाटोप सुरु केला आहे. मराठी भाषिकांच्या हक्कांना डावलून महापालिकेत केवळ स्वतःच्या अजेंड्यानुसार ठराव मंजूर व्हावा, यासाठी मठानेदेखील या आंदोलनाला पाठबळ द्यावे, अशी मागणी कन्नड संघटनानी केली आहे.

कन्नड संघटनांच्या या मागणीवर बोलताना, बेळगाव कर्नाटकात ठेवण्यासाठी मठाचे पूर्वीपासून योगदान राहिले असल्याचे अल्लमप्रभू स्वामीजी यांनी म्हटले. महानगरपालिकेत हा ठराव तातडीने मंजूर करून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायालयीन प्रक्रियेचे कारण पुढे करू नये, अशी प्रतिक्रिया अल्लमप्रभू स्वामीजी यांनी दिली आहे. मात्र स्वामीजींच्या या प्रतिक्रियेमुळे सीमाभागातील मराठी भाशिकांतून संताप व्यक्त होत आहे.


Recent Comments