बेळगावमधील घटणारे पर्जन्यमान आणि पर्यावरणाचा ढासळता दर्जा यावर आमदार आसीफ सेठ यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. महापालिकेच्या वतीने आयोजित जागतिक पर्यावरण दिनानिमित्त यवा पिढीने आपल्या उज्वल भविष्यासाठी पर्यावरण संवर्धनात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

बेळगाव महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक ३५ मधील नंदिनी मार्ग उद्यानात मुख्यमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय घोषणेनुसार मियावाकी पद्धतीचा वनविकास कार्यक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवत आमदार आसीफ सेठ यांनी सराव वाढत्या प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त केली. बेळगावातील हिरवळ कमी झाल्यामुळे पावसाचे प्रमाण घटत असून विद्यार्थ्यांनी आपल्या घराभोवतालच्या रिकाम्या जागेत किमान एक तरी झाड लावून निसर्गाचा समतोल साधावा, असे प्रतिपादन आमदार आसीफ सेठ यांनी केले. तसेच महापालिका आज १ हजार ससी लावत असून नागरिकांनी जबाबदारीने त्याचे जतन करावे, असे आवाहन आमदार आसीफ सेठ यांनी केले.

लागवड केलेल्या रोपांचे झाड होईपर्यंत त्यांचे रक्षण करणे गरजेचे आहे. वृक्ष लागवडीमुळे पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळण्यासोबतच इतर सजीवांनाही आश्रय मिळतो, ज्यामुळे निसर्गाचा समतोल राखण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया विद्यार्थी चन्नवीरय्या यांनी दिली.

या प्रसंगी नगरसेवक श्रेयस नाकाडी, राठोड, महापालिकेचे ए डबल ई हणमंत कलादगी यांच्यासह राणी चेन्नम्मा विद्यापीठाचे प्राध्यापक आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Recent Comments