State

सिद्धरामय्या यांचा मुख्यमंत्री पदाचा अधिकृत राजीनामा

Share

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या पदाचा अधिकृत राजीनामा दिला असून हायकोर्ट आणि हायकमांडच्या ऑफरनंतरही त्यांनी दिल्लीच्या राजकारणात न जाता कर्नाटकातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटच्या श्वासापर्यंत राज्यातील जनतेची सेवा करत सक्रिय राजकारणात राहण्याची घोषणा त्यांनी केली आहे.

मुख्यमंत्री पदाचा अधिकृत राजीनामा दिल्यानंतर बेंगळुरूमधील गृहकार्यालय कृष्णा येथे आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत सिद्धरामय्या यांनी आपल्या भविष्यातील राजकीय प्रवासाबाबत अत्यंत महत्त्वाची घोषणा केली. काँग्रेस हायकमांडने त्यांना दिल्लीच्या राजकारणात येण्याची आणि राज्यसभेवर जाण्याची ऑफर दिली होती, मात्र ती अत्यंत नम्रपणे नाकारल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेवटच्या श्वासापर्यंत कर्नाटकच्या राजकारणातच सक्रिय राहून कार्य करणार असल्याचे सिद्धरामय्या यांनी म्हटले.

लोहिया भवन येथे जाऊन सिद्धरामय्या यांनी राज्यपालांच्या सचिवांकडे आपला राजीनामा पत्र सुपूर्द केले. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यसभेच्या ऑफरचा विशेष उल्लेख केला. हायकमांडने दिल्लीत येण्याचा आग्रह धरला होता, परंतु कर्नाटकच्या जनतेने आपल्याला पाच वर्षांसाठी आमदार म्हणून निवडून दिले असल्याने राज्याबाहेर जाणे मान्य नसल्याचे त्यांनी सांगितले. आपण कोणाच्याही दबावाला बळी न पडता पूर्णपणे स्वयंप्रेरणेने मुख्यमंत्री पदाचा त्याग केला असल्याचे सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले.

आपल्या ५० वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासाचे स्मरण करताना सिद्धरामय्या अत्यंत भावुक झाले आणि त्यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बी. आर. आंबेडकर यांचे आभार मानले. देशात संविधान नसते तर आपल्याला शिक्षण आणि उपमुख्यमंत्री किंवा दोनदा मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली नसती, अन्यथा गावातच राहावे लागले असते, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. संविधानाला धक्का लावणाऱ्या आणि जातीयवादी शक्तींच्या विरोधात आपला संघर्ष निरंतर सुरू राहील, असे सिद्धरामय्या यांनी शेवटी म्हटले.

Tags: