Belagavi

सीईटी परीक्षेवेळी जानवे काढायला लावल्याने ब्राह्मण महासभेचा संताप

Share

सीईटी परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांचे जानवे काढायला लावणाऱ्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या धोरणाने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत आज बेळगावमध्ये अखिल भारतीय ब्राह्मण महासभेतर्फे तीव्र निदर्शने करण्यात आली.

बेळगावमध्ये आज अखिल भारतीय ब्राह्मण महासभेच्या वतीने एकत्र येत सीईटी परीक्षेदरम्यान जानवे काढायला लावणाऱ्या जाचक नियमाचा निषेध करण्यात आला. या कृतीमुळे विद्यार्थ्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा येत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

सीईटी परीक्षेवेळी जानवे, मंगळसूत्र आणि बांगड्या काढायला लावणे हे संविधानाने दिलेल्या धार्मिक अधिकारांचे उल्लंघन आहे. जानवे केवळ ब्राह्मणच नव्हे तर इतर समाजातील नागरिकही परिधान करतात, त्यामुळे प्रशासनाने अशा द्वेषपूर्ण भावना ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासभेचे जिल्हाध्यक्ष जयतीर्थ सवदत्ती यांनी केली आहे.

या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरकारला निवेदन सादर करण्यात आले. या आंदोलनात ब्राह्मण समाजाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: