
राज्य सरकार आणि साखर कारखान्यांच्या विरोधात ऊसाच्या आधारभूत किमतीसाठी बेळगाव जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या आंदोलनाची तीव्रता आता बैलहोंगल शहरातही पोहोचली आहे.
बैलहोंगल तालुक्यातील अनेक शेतकरी संघटनांनी एकत्र येत शहरातील राणी चन्नम्मा चौकात मोठे आंदोलन छेडले आहे. ऊसाला प्रति टन ३,५०० रुपये हमीभाव मिळालाच पाहिजे, या मागणीवर शेतकरी ठाम असून, जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
शेतकरी नेते शंकर मूडलगी यांनी या आंदोलनाबद्दल बोलताना, “शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढणार आहोत. सरकार केवळ आश्वासने देत आहे, कृती करत नाही,” असे स्पष्ट केले.
बसनगौडा पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना, “साखर कारखान्यांनी आपला नफा कमी करून शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करावा. अन्यथा, आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
या आंदोलनाला विविध संघटना आणि वकिलांनी पाठिंबा दर्शवला आहे. आता राज्य सरकार आणि साखर कारखाने शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करतात की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Recent Comments