बेळगाव जिल्ह्याच्या मूडलगी तालुक्यातील गुर्लापूरजवळ ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान एका अन्नदात्याने विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ऊसाच्या दरासाठी गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनात मन व्यथित झाल्यामुळे लक्कप्पा गुणदार (वय ३०, रा. आलकनूर, ता. रायबाग) या शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलले. खासदार जगदीश शेट्टर उपस्थितांना संबोधित करत असतानाच ही घटना घडली.
खासदार जगदीश शेट्टर शेतकऱ्यांशी बोलत असतानाच शेतकऱ्याने विष प्राशन केले. ऊसाचे दर निश्चित करण्यासाठी गेल्या पाच दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. आंदोलनादरम्यान मन व्यथित झाल्याने अन्नदात्याने विष प्राशन केले. दरम्यान आंदोलकांनी तात्काळ लक्कप्पांना अस्वस्थ अवस्थेत हारूगेरी येथील रुग्णालयात दाखल केले. सध्या लक्कप्पा यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून मूडलगी पोलीस स्थानकात याची नोंद करण्यात आली आहे.


Recent Comments