चिकोडी तालुक्यातील मांजरी गावाजवळील चिकोडी-मिरज रस्त्यावरील पुलावर दुर्दैवी अपघात घडला. बाइकवरून जात असताना एक महिला खाली पडली आणि त्याच वेळी बभरधाव येणाऱ्या कारणे सदर महिलेला चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

मृत महिलेचे नाव संगीता काशप्पा सामने (वय २५) असे असून, त्या मूळच्या कागवाड तालुक्यातील जूगुळ गावच्या रहिवासी होत्या. संगीता या पती काशप्पासोबत दुचाकीवरून जात असताना अचानक त्या खाली पडल्या आणि मागून आलेली कार त्यांच्या अंगावरून गेली. त्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघातानंतर कार आणि चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे. याप्रकरणी अंकली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


Recent Comments