मुस्लीम समाजाच्या पवित्र उत्सवांपैकी एक असलेल्या ईद ए मिलादनिमित्त धारवाडमध्ये जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मुस्लीम समाजाच्या पवित्र उत्सवांपैकी एक असलेला ईद ए मिलाद हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील मशिदींमध्ये सर्व मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन नमाज अदा केली. तसेच शहरातील प्रमुख रस्त्यांवर मिरवणुकीचेही आयोजन करण्यात आले होते. ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर धारवाड अंजुमन संघटना व विविध मुस्लिम संघटनांच्या नेतृत्वाखाली मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. धारवाड प्रादेशिक मध्यवर्ती बसस्थानकापासून हि मिरवणूक सुरू होऊन अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवरून मार्गस्थ होऊन ज्युबिली सर्कलला येऊन मिरवणुकीची सांगता झाली. सणाच्या पार्श्वभूमीवर सर्व मुस्लिम समाजबांधवांनी एकमेकाला शुभेच्छा देऊन आनंद साजरा केला. मिरवणूक मार्गावर अनेक ठिकाणी लोकांना शीतपेयाचे वाटप करण्यात येत होते.


हुबळी धारवाडचे पोलीस आयुक्त एन शशिकुमार यांनी मिरवणुकीच्या ठिकाणी भेट देऊन मान्यवरांना शुभेच्छा दिल्या. या सणाच्या पार्श्वभूमीवर मुलांनी खास वेशभूषा करून लक्ष वेधले.


Recent Comments