चिक्कोडी नगरपालिकेच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा भाजपच्या वीणा जगदीश कवटगीमठ आणि काँग्रेसचे इरफान बेपारी यांची गुरुवारी बिनविरोध निवड झाली.

भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांनी एकजुटीने पाऊल टाकत या निवडणुकीत आश्चर्यकारक मतदान केले असून पडद्यामागील खेळाने काँग्रेस-भाजप युतीची सत्ता चिक्कोडी नगरपालिकेवर आली आहे. २३ सदस्यीय नगरपालिकेत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकारी, तहसीलदार चिदंबर कुलकर्णी यांनी बिनविरोध निकाल जाहीर केला.

प्रभाग क्रमांक 20 मधील वीणा कवटगीमठ यांनी अध्यक्षपदासाठी तर प्रभाग क्रमांक 8 मधून इरफान बेपारी यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. 23 सदस्यांपैकी 10 काँग्रेसचे तर 13 भाजपचे सदस्य आहेत. राज्य सरकारचे दिल्ली विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी, चिक्कोडी-सदलगाचे आमदार गणेश हुक्केरी आणि अध्यक्षपदी निवडून आलेले वीणा यांचे पती जगदीश यांच्या पडद्यामागील खेळामुळे काँग्रेस-भाजप युतीची सत्ता शक्य झाल्याची चर्चा रंगत आहे.


Recent Comments