पॅराशूट शैलीतील हवामान निरीक्षण करणारे उपकरण जमिनीवर कोसळल्याची घटना विजयपूरमधील चडचण तालुक्यातील मरगुर येथे घडली आहे.

इस्रोकडून प्रक्षेपण करण्यात आलेले पॅराशूट शैलीतील हवामान निरीक्षण करणारे लो इंटेन्सिटी वेदर मॉनिटरिंग सिस्टम हे उपकरण जमिनीवर कोसळले. इस्रोच्या बेंगळूर शाखेतून काही दिवसांपूर्वी या उपकरणाचे प्रक्षेपण करण्यात आले होते. अक्षांश हवामान निरीक्षण यंत्र स्थानिक क्षेत्राची हवामान माहिती संकलित आणि प्रसारित करते. हैदराबाद येथील इस्रो कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून या उपकरणावर देखरेख करण्यात येत होती.

या घटनेची माहिती मिळताच इस्रोचे शास्त्रज्ञ घटनास्थळी दाखल झाले आहेत. शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ आल्यानंतर व तपासणी केल्यानंतर अधिक माहिती उपलब्ध होईल, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राकेश जैनापूर यांनी दिली आहे. हे यंत्र जमिनीवर कोसळल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती.


Recent Comments