Banglore

काही लोकांना माझ्या आठवणींशिवाय झोपही येत नाही – डीसीएम डीके शिवकुमार

Share

एचडी कुमारस्वामी आमदार असलेल्या चन्नपट्टणममध्ये लोकांनी त्यांच्या तक्रारींबद्दल 10 हजार अर्ज दिले आहेत. उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी कुमारस्वामींनी लोकांसाठी काम केले नसल्याची टीका केली .

बंगळुरू येथील काँग्रेस कार्यालयात मीडियाशी बोलताना उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार म्हणाले कि मंड्या येथील
जनदर्शनादरम्यान मला साडेतीन हजार अर्ज आले आहेत. जनतेचे प्रश्न सोडविण्यात सरकार अपयशी ठरले आहे. मंत्री आणि आमदारांनी काम केले नाही या कुमारस्वामींच्या आरोपाकडे मीडियाने लक्ष वेधले तेव्हा उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी प्रत्युत्तर दिले.

“कुमारस्वामी यांनी मत व्यक्त केले आहे. पण चन्नपट्टणमच्या लोकांनी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी हजारो अर्ज दिल्याची नोंद आमच्याकडे आहे. आमच्याकडे दूरध्वनी क्रमांक आहेत. याविषयी आम्ही काय बोलू?” कुमारस्वामी एकटेच राजकारण करत आहेत का? आम्हालाही राजकारण येते. पण आमच्यासाठी राजकारण महत्त्वाचे नाही, लोकसेवा महत्त्वाची आहे. म्हणूनच आम्ही हा कार्यक्रम करत आहोत, असे ते म्हणाले.

Tags: