Banglore

बेळगाव ग्रामीण मतदारसंघाला बंपर गिफ्ट!800 कोटी रु. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची सहमती

Share

महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मांडलेल्या बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी सुमारे 800 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या आराखड्याला मंजुरी देण्यात आली. लक्ष्मी हेब्बाळकर यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या हिरेबागेवाडीतील 61 तलाव भरण्यासाठी अंदाजे रु. 519.10 कोटींच्या सुधारित प्रकल्प अहवालास मंजुरी देण्यात अली आहे. या प्रकल्पासाठी लक्ष्मी हेब्बाळकर गेल्या 5 वर्षांपासून जोर लावत आहेत. काही लोकांच्या चुकांमुळे हा प्रकल्प रखडला होता. मात्र न डगमगणाऱ्या हेब्बाळकरांना आता प्रकल्प मंजूर करण्यात यश आले आहे.

तसेच बेळगाव तालुक्यातील उचगाव आणि संतीबस्तवाड सर्कलमध्ये येणारे 20 तलाव भरण्यासाठी 287.55 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मंत्रिमंडळाने या प्रकल्प अहवालालाही मान्यता दिली आहे. या बहुचर्चित प्रकल्पांना मंजुरी दिल्याबद्दल मतदारसंघातील जनतेने मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे आभार मानले आहेत.

लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मंत्रिमंडळात प्रकल्पाना संमती दिल्याबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व कॅबिनेट मंत्र्यांचे आभार मानले आहेत.

Tags: