Banglore

‘लोकसभा’ लढण्यास अनुत्सुक मंत्र्यांना डीकेशींचा कडक इशारा

Share

राज्यातील विविध निगम, महामंडळांवर 39 कार्यकर्ते आणि 36 आमदारांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी सांगितले.

विधानसौध येथे आज प्रसारमाध्यमांशी बोलताना डीसीएम डीके शिवकुमार यांनी सांगितले की, निगम, महामंडळांवर 39 कार्यकर्ते आणि 36 आमदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते म्हणाले की, पंतप्रधानांच्या आगमनामुळे उद्या दुपारी होणारी मंत्रिमंडळ बैठक सायंकाळी साडेचारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडीबाबत बोलताना डीकेशी म्हणाले की, यासंदर्भात बैठक घेऊन चर्चा केली जाईल. आमच्या मंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात जाऊन जनतेची मते जाणून घेतली आहेत. लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार देणाऱ्या मंत्र्यांवर भाष्य करताना ते म्हणाले की, पक्ष काय म्हणतो ते मलाही ऐकावे लागेल, अन तुम्हालाही ऐकावे लागेल.

मंड्यामध्ये सुमलता अंबरीश या काँग्रेसच्या उमेदवार असतील का? या प्रश्नावर माझ्याकडे याबाबत कोणतीही माहिती नाही, तुमच्याकडे असल्यास मला सांगा, असे उत्तर त्यांनी दिले.

Tags: