माजी केंद्रीय कृषी, संरक्षण मंत्री आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांचा ८४ वा वाढदिवस चिक्कोडी येथे साजरा करण्यात आला .


शरद पवार यांचा वाढदिवस चिक्कोडी शहरातील राष्ट्रवादी कार्यालयात केक कापून साजरा करण्यात आला. त्याच संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिक्कोडी जिल्हाध्यक्ष सरदार खान पठाण म्हणाले की, शरद पवार हे तेजस्वी नेते, माजी केंद्रीय संरक्षण आणि माजी कृषी मंत्री होते . त्यांनी देशासाठी मोठे योगदान दिले आहे.

त्यानंतर बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष संतोष रायजाधव म्हणाले की, शरद पवार हे देशाचे महान नेते असून त्यांचे देशासाठी योगदान मोठे आहे.आम्ही आगामी काळात पक्ष संघटित करून पुढील निवडणुकीत सरदार खान पठाण यांना राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून उभे करू.
यावेळी व्यापारी राजा जाधव, खलिल पिरजादे, नईम मुल्ला, रझाक पठाण, शकील अम्मनगी यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments