Belagavi

आ. अभय पाटील यांच्याकडून वर्ल्ड कप पाहण्यासाठी 15 एलईडी स्क्रीन्स

Share

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज होणारी वर्ल्ड कप फायनल मॅच बघण्यासाठी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी मतदार संघातील शहापूर, खासबाग भागात 15 एलईडी स्क्रीन्सची सोय केली. यावेळी त्यांच्या वतीने क्रिकेट रसिकांना चहा-बिस्किटे, लस्सी, आईसक्रीम, चॉकलेट्सचे वाटप करण्यात आले.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम लढतीकडे साऱ्या जगाचे लक्ष वेधले आहे. अंतिम सामन्यात कोण बाजी मारणार याची उत्कंठा क्रिकेटरसिकांना लागून राहिली आहे. या पार्श्वभूमीवर क्रिकेटरसिकांना एकत्र बसून सामन्याचा आनंद लुटता यावा यासाठी बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांनी आज रविवारी मतदारसंघातील शहापूर, खासबाग भागात एक अनोखी, विशेष संकल्पना राबवली. एकूण 15 ठिकाणी त्यांनी भव्य एलईडी स्क्रीन्स उभारून क्रिकेटरसिकांना सामना पाहण्याची सोय करून दिली. इतकेच नव्हे तर त्यांना चहा-बिस्किटे, लस्सी, आईसक्रीम, चॉकलेट्सचे वाटप करण्यात आले. उंच स्टेज उभारून त्यावर भव्य एलईडी स्क्रीन्स आणि समोर बसण्यासाठी खुर्च्या घालण्यात आल्या होत्या.


दरम्यान, आ. अभय पाटील यांनी 7 ठिकाणी एलईडी स्क्रीन्स उभारले असतानाच शहापूर पोलिसांनी त्यांना आक्षेप घेत स्क्रीन्स काढून टाकण्याची सूचना केली. पोलिसांच्या या सूचनेमुळे आ. अभय पाटील व त्यांचे सहकारी नगरसेवक चांगलेच संतापले. आ. पाटील यांनी, आक्षेप घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना खडसावून, आम्हाला आमची जबाबदारी कळते. ही सोय निःपक्षपातीपणे, क्रिकेटरसिकांना वर्ल्ड कप फायनलचा आनंद लुटण्यासाठी केली आहे. यात कुठले राजकारण नाही, किंवा समाजविरोधी कृत्य केलेले नाही, तुम्ही विरोध केला तरी उरलेल्या 8 ठिकाणीसुद्धा आम्ही एलईडी स्क्रीन्स उभारल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी सुनावले.

दरम्यान, प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना आ. अभय पाटील यांनी क्रिकेटरसिकांना वर्ल्ड कप फायनलचा आनंद लुटण्यासाठी एलईडी स्क्रिन्सची सोय केली आहे असे सांगितले. याठिकाणी आम्ही क्रिकेटरसिकांना चहा-बिस्किटे, लस्सी, आईसक्रीम, चॉकलेट्सचे वाटप करणार आहोत. त्याशिवाय भारताने सामना जिंकल्यावर नागरिकांना पेढे वाटण्यासाठी 300 किलो पेढ्यांची ऑर्डर दिली असून, त्यापैकी 100 किलो पेढे उपलब्ध झाले आहेत. खव्याअभावी आणखी पेढे उपलब्ध झालेले नाहीत. पण बाहेरून पेढे मागविणार आहोत असे सांगितले.

.
पोलिसांच्या माध्यमातून राज्यातील काँग्रेस सरकार आपल्या या चांगल्या उपक्रमात खोडा घालत आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला. भारत अंतिम फेरीत आला ही चूक की काँग्रेस सरकार सत्तेत आले ही चूक आहे? याचा निर्णय जनतेने घ्यावा. येथे केवळ भाजपचेच कार्यकर्ते येऊन मॅच बघणार नाहीत तर सर्व विचारधारेचे लोक येणार आहेत. सगळ्यांसाठी हा उपक्रम आपण राबवत आहोत. सरकारने खेळात राजकारण आणू नये, असे आवाहन त्यांनी केले.

हा विशेष उपक्रम राबविण्याची संकल्पना अचानक कशी सुचली? या प्रश्नावर, बेळगाव दक्षिणमधील लोकांनी मला विशेष करण्यासाठीच निवडून दिले आहे असे उत्तर आ. अभय पाटील यांनी दिले

दरम्यान, एलईडी स्क्रीन्स बसवलेल्या भागातील लोकांनी आ. अभय पाटील यांच्या या संकल्पनेचे जोरदार स्वागत करून अंतिम सामन्याचा भरभरून आनंद लुटला. यावेळी नगरसेवक रवी धोत्रे, जयंत जाधव, नगरसेविका वाणी जोशी, रविराज सांबरेकर आदी उपस्थित हो

Tags: