उडुपी जिल्ह्याच्या पालक मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी उडुपी येथील गंगोळी बंदरातील आगीच्या दुर्घटनेच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.


त्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आग दुर्घटना स्थळाला भेट देऊन पाहणी केल्यानंतर मत्स्य विभागाचे अधिकारी आणि स्थानिक मच्छिमारांशी चर्चा केली.
आगीत सुमारे बोटी जळून 13 ते 15 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. संबंधितांना 15 दिवसांत भरपाई देऊन दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी त्यांनी तेथे असलेल्या मच्छिमार आणि बोटी गमावलेल्या मालकांचे सांत्वन केले.

9 बोटी व दोन छोट्या बोटी पूर्णत: जळाल्याची खंत व्यक्त करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मत्स्य व बंदरे मंत्री यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्यात येईल, असे मंत्री म्हणाले. अशी घटना पुन्हा घडू नये. खबरदारीचा उपाय म्हणून बंदरात अग्निशमन दल स्थापन करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. बाइट
यावेळी जिल्हाधिकारी विद्याकुमारी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. के. अरुण, नेते गोपाळ पुजारी आदी उपस्थित होते.


Recent Comments