Khanapur

अंजली निंबाळकर यांच्यावर काँग्रेसची नवी जबाबदारी

Share

खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांची केपीसीसी अध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांनी राज्यातील ‘एसआयआर’ प्रक्रियेसाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

डॉ. अंजली निंबाळकर यांच्याकडे सध्या एआयसीसी अंतर्गत गोवा राज्याची जबाबदारी आहे. आता केपीसीसीने त्यांच्याकडे कित्तूर कर्नाटक विभागातील बेळगाव शहर, बेळगाव ग्रामीण, चिकोडी, बागलकोट, विजापूर, गदग, हावेरी, उत्तर कन्नत, हुबळी शहर आणि धारवाड ग्रामीण या १० जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे.

या जिल्ह्यांमध्ये डॉ. निंबाळकर लवकरच दौरा करणार आहेत. पक्षाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रक्रिया योग्य रीतीने पार पडत आहे की नाही, याची पाहणी करून त्या आपला अहवाल केपीसीसीला सादर करतील.

Tags: