मुलगा बीवाय विजयेंद्रला भाजप प्रदेशाध्यक्षपद मिळावे यासाठी लॉबिंग केले नाही किंवा हायकमांडवर कधीही दबाव आणला नाही असे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी स्पष्ट केले.

माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी शनिवारी त्यांचा मुलगा बीवाय विजयेंद्र यांना भाजपचे प्रदेशाध्यक्षपद मिळाल्याबद्दल प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. मी विजयेंद्रसाठी कधीही लॉबिंग केले नाही. पक्ष सोडून गेलेल्यांनाही परत बोलावण्याचा प्रयत्न करणार आहोत. भाजपला सर्वांना एकत्र आणण्याची चिंता आहे. म्हणून विजयेंद्र यांना प्रदेशाध्यक्षपद दिले आहे असे ते म्हणाले.

प्रदेशाध्यक्षपदासाठी निवड झालेल्या पुत्र बी.वाय. विजयेंद्र यांना येडियुरप्पानी शुभेच्छा दिल्या आणि लोकसभा निवडणुकीत पक्ष 25 पेक्षा जास्त जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला. पक्ष बळकट करण्यासाठी नवीन प्रदेशाध्यक्षांसोबत राज्याचा दौरा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले


Recent Comments