येडियुरप्पा यांचा मुलगा असल्याचा मला अभिमान आहे. पक्ष सोडून जाण्याच्या विचारात असलेल्या सर्वांना सोबत घेऊन जाईन. येत्या शुक्रवारी विरोधी पक्षनेत्याची निवड करण्यात येईल. त्यासाठी दिल्लीहून पक्ष निरीक्षक येणार आहेत असे नूतन भाजप प्रदेशाध्यक्षपद बी. वाय. विजयेंद्र यांनी सांगितले.

प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर विजयेंद्र यांनी आज, शनिवारी बुथस्तरीय अध्यक्षांच्या घरी भेट देऊन संघटनेत पहिले पाऊल टाकले आहे. यातून त्यांनी कार्यकर्ते असतील तर कार्यकर्त्यांमधूनच पक्ष वाढतो हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
विजयेंद्र यांनी शनिवारी सकाळी गांधीनगर विधानसभा मतदारसंघातील कुमार कृपा बूथ क्रमांक 40 चे अध्यक्ष शशिधर यांच्या घरी भेट दिली. पक्षाच्या बूथ स्तरावरील संघटनेबाबत त्यांच्याशी चर्चा केली.

येडियुरप्पा यांचा मुलगा असल्याचा मला अभिमान आहे. पक्ष सोडून जाण्याच्या विचारात असलेल्या सर्वांना सोबत घेऊन जाईन. येत्या शुक्रवारी विरोधी पक्षनेत्याची निवड करण्यात येईल. त्यासाठी दिल्लीहून पक्ष निरीक्षक येणार आहेत. सोमण्णा, अशोक, यत्नाळ, बोम्मई या सर्वांना विश्वासात घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पक्ष संघटनेची मोठी जबाबदारी सोपवल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बीएल संतोष यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.


Recent Comments