बेळगावातील कॅम्प परिसरात रहिवाशांना सध्या तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीत समाजसेवक साजिद शेख त्यांच्या मदतीला देवदूतासारखे धावून आले आहेत. त्यांनी स्वतःच्या टँकरमधून स्वखर्चाने रहिवाशांना मोफत पाणीपुरवठा सुरु केलाय.

होय, बेळगावातील कॅम्प परिसरातील रहिवाशी सध्या साजिद शेख यांच्या दातृत्वाला सलाम ठोकत आहेत. त्याला कारणही तसेच आहे. एरव्ही वर्षभर देखील पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या बेळगावातील कॅम्प परिसराला गेल्या तीन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई भासत आहे.

त्याची नोंद घेऊन दरवर्षीप्रमाणे साजिद शेख यंदाही त्यांच्या मदतीला धावून आलेत. त्यांनी स्वतःच्या टँकरमधून स्वखर्चाने कॅम्पच्या रहिवाशांना पाणीपुरवठा सुरु केलाय. पोस्ट ऑफिससमोरील आयनॉक्स थिएटरजवळील विहिरीतून पाणी आणून ते जनतेला पुरवत आहेत. याबाबत त्यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. बाईट.
कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष असलेल्या साजिद शेख यांच्या या कार्याला सलाम तर केलाच पाहिजे


Recent Comments