Belagavi

बेळगावात कर्नाटक ऑर्थोपेडिक असोसिएशनची ४७ वी परिषद

Share

कर्नाटक ऑर्थोपेडिक असोसिएशनची ४७ वी परिषद बेळगावातील जेएनएमसी वैद्यकीय महाविद्यालयात उद्यापासून तीन दिवस आयोजित करण्यात आली आहे.

बेळगावात पत्रकार परिषदेत याची माहिती देताना संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. शैलेश उदपुडी यांनी ही माहिती देऊन सांगितले की, ३ ते ५ फेब्रुवारी या काळात कर्नाटक ऑर्थोपेडिक असोसिएशनची ४७ वी परिषद बेळगावातील जेएनएमसी वैद्यकीय महाविद्यालयात होणार आहे. या परिषदेत देशातील अनेक नामवंत अस्थिरोग तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. “स्ट्रॉन्ग बोन्स- स्ट्रॉन्ग नेशन” हे या परिषदेचे सूत्र आहे. कर्नाटक आणि शेजारी राज्यातील सुमारे १५०० प्रतिनिधी या परिषदेत भाग घेण्याची अपेक्षा आहे. ऑर्थोपेडिक क्षेत्रातील नवनवीन संशोधन आणि अविष्कारांवर परिषदेत तज्ज्ञ विचार मांडणार असून विचारमंथन करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी कर्नाटक ऑर्थोपेडिक असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अश्विनीकुमार सिंग, सरचिटणीस डॉ. भारत राजू, सचिव डॉ. अनिल पाटील, कोषाध्यक्ष डॉ. पुनीत चमकेरी आदी उपस्थित होते.

Tags: