Belagavi

भाविकांच्या सोयीसाठी यात्री निवास बांधणार : मंत्री शशिकला जोल्ले

Share

चिक्कोडी तालुक्यातील एकसंबा शहरातील आराध्यदेव बिरेश्वराचे सीमाभागात मोठ्या संख्येने भाविक आहेत. भाविकांच्या सोयीसाठी यात्रेकरू निवास बांधण्यात येत असल्याचे धर्मादाय, हज आणि वक्फ मंत्री शशिकला जोल्ले यांनी सांगितले.

बिरेश्वर मंदिराच्या आवारात नव्याने बांधण्यात येत असलेल्या बिरेश्वर यात्री निवास इमारतीचे भूमिपूजन केल्यावर त्या बोलत होत्या. बिरेश्वर यात्री निवासाच्या बांधकामासाठी 25 लाखांचे अनुदान मंजूर करण्यात आले असून, अनुदान कमी पडल्यास पुन्हा वाढीव अनुदान देणार असल्याचे मंत्री जोल्ले यांनी सांगितले.

त्यानंतर बोलताना खासदार अण्णासाहेब जोल्ले म्हणाले की, दर रविवारी व अमावास्येला व जत्रेच्या वेळी मोठ्या संख्येने भाविक बिरेश्वराचे दर्शन घेण्यासाठी येतात. आणि आमच्या संस्थेचे नाव बिरेश्वर असे ठेवण्यात आले असून, आगामी काळात कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा तसेच गुजरात राज्यातही संस्थेच्या शाखा सुरू करण्यात येणार आहेत, बीरेश्वरच्या आशिर्वादामुळे संस्थेसह जोल्ले उद्योग परिवार सर्वच क्षेत्रात वाढत आहे, असे ते म्हणाले.

यावेळी समितीचे सदस्य जयनंद जाधव, आप्पासाहेब जोल्ले, मारुती पुजारी, दिलीप देसाई, कृष्णा माळी, महादेव रायजाधव, मंजुश्री कट्टीकर, राजू मगदुम, चिदानंद मोपगार, राजू कट्टीकर, अण्णाप्पा पुजारी, वैशाली मगदुम व ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags: