चिक्कोडी उपविभागातील निपाणी ग्रामीण पोलीस ठाणे व निप्पाणी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका, अवैध जुगार, अवैध दारू विक्री अशा बेकायदेशीर कृत्यांत सहभागी असलेल्या आणखी दोन आरोपींना हद्दपार करण्याचे आदेश चिक्कोडीच्या प्रांताधिकाऱ्यांनी जारी केले आहेत.

व्हॉइस : निप्पाणी तालुक्यातील अकोळ येथील चंद्रकांत शंकर वड्डर आणि निप्पाणी तालुक्यातील जमादार प्लॉट येथील संजय चंद्रकांत परकट्टी अशी तडीपार केलेल्या आरोपींची नावे आहेत. यापैकी चंद्रकांत वड्डर हा मटका, जुगार आणि बेकायदेशीर दारू विक्री आदी सुमारे 36 प्रकरणात सहभागी होता आणि त्याला चिक्कोडी उपविभागातून कोलार जिल्ह्यात 9 महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.

संजय चंद्रकांत परकट्टी सुमारे 4 बेकायदेशीर प्रकरणांमध्ये गुंतला असून त्याला रामदुर्ग तालुक्यात हद्दपार करण्यात आले आहे. यापूर्वी 10 आरोपींना बेळगाव जिल्ह्यातून हद्दपार केल्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ आता आणखी दोन आरोपींना हद्दपार करण्यात आले आहे. त्यामुळे गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या आरोपींचे धाबे दणाणले आहेत.


Recent Comments