Belagavi

हारुगेरी येथे पार पडला अनोखा विवाहसोहळा

Share

लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात असे मानतात. परंतु काही लोकांच्या लग्नाच्या बाबतीत हे गणित काहीसे वेगळेच असते. प्रत्येकजण आपल्याला अनुरूप जोडीदार मिळावा या भावनेत असतात. विवाहेच्छुकांपेक्षा त्यांच्या पालकांनाच याची चिंता अधिक असते. मात्र कुणी मूक, बधिर किंवा दिव्यांग असेल तर त्यांच्या विवाहाचे काय? हा यक्षप्रश्न देखील पालकांना सतावत असतो. या प्रश्नाचे उत्तर शोधात हारुगेरी येथे एक जोडपे विवाहबंधनात अडकले आहे. त्यांच्या या अनोख्या विवाहाची कहाणी जाणून घेऊयात या पुढील रिपोर्टच्या माध्यमातून….

व्हॉइस : बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील हारुगेरी येथे एका मुब् बधिर जोडप्याचा विवाहसोहळा पार पडला आहे. रायबाग तालुक्यातील हारुगेरी येथील रहिवासी ज्योतेप्पा उमराणी यांची कन्या स्वाती. जन्मतःच मूक असलेल्या स्वातीच्या उपचारासाठी अनेक रुग्णालयांच्या पायऱ्या झिजविल्या. मात्र याचा काहीच उपयोग झाला नाही. आपल्या मुलीचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात व्हावा, अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. हीच इच्छा स्वातीच्या आई वडिलांनीही बाळगली होती. मात्र स्वातीच्या मूकपणामुळे यात अनेक अडचणी निर्माण व्हायच्या. अनेक मूक तरुणांनीही स्वातीला नकार दिला. योगेश उमराणीने स्वातीच्या लग्नासंदर्भात येत असलेल्या अडचणी लक्षात घेत त्याने आपल्या मित्रांशी संवाद साधला. मुगळखोड येथील रहिवासी असलेल्या सिद्धू नामक मित्राला हि सारी बाब सांगितली. यावेळी मूक स्वातीशी विवाह करण्याची तयारी दाखवून दोन्ही कुटुंबांची सहमती घेऊन हा विवाहसोहळा थाटात संपन्न झाला. मूक स्वातीच्या विवाहाची हि अनोखी बाब दोन्ही कुटुंबासाठी समाधानकारक असल्याचे कुटुंबीय सांगतात.

शब्दांपेक्षाही अधिक ताकद मौनात असते. हि बाब लक्षात घेऊन उमराणी कुटुंबीयांनी केलेले कन्यादान हे अनमोल असल्याचे स्वातीचे सासरे गिरीमल्लप्पा मुधोळ सांगतात. स्वाती उमराणी या मूक युवतीच्या या अनोख्या विवाहसोहळ्याला अनेकांनी अगदी मनापासून हजेरी लावलेली पाहायला मिळाली. मूक युवतीशी विवाह करण्याचा निर्णय घेतलेल्या युवकाचे कौतुक संपूर्ण परिसरात झाले. केवळ बोलता येत नाही या कारणास्तव नकार देणारी अनेक स्थळे स्वातीला आली. मात्र तिच्या या कमतरतेचा विचार न करता घेतलेल्या निर्णयाचे रायबाग परिसरात कौतुक करण्यात आले. या विवाहसोहळ्याला आमदार पी राजीव यांचीही उपस्थिती होती. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, नाते हे कोणतेही असो मात्र ते मनापासून जपणे आवश्यक आहे.

 

आपल्या मुलीच्या विवाहासंदर्भात असलेल्या काळजीला पूर्णविराम मिळून रायबाग मध्ये एक अनोखा विवाहसोहळा पार पडल्याचे समाधान युवतीच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते.

Tags: