Belagavi

बेळगावमधील अल्पसंख्यांक नेत्यांची चिंतन बैठक काँग्रेस नेत्यांचा सहभाग

Share

आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चिंतन करण्यासाठी बेळगावमध्ये काँग्रेस अल्पसंख्यांक नेत्यांची चिंतन बैठक बोलाविण्यात आली होती.

बेळगाव शहरातील ताज गार्डन येथे शनिवारी काँग्रेस अल्पसंख्यांक नेत्यांची चिंतन बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत आमदार जमीर अहमद यांच्यासह शेकडो अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांनी सभेत सहभाग घेतला होता. या सभेत स्थानिक काँग्रेस नेत्यांचीही उपस्थिती होती. यावेळी आगामी निवडणुकीसंदर्भात चिंतन करण्यात आले. (फ्लो)

यावेळी बैठकीत आपले मनोगत व्यक्त करताना आमदार जमीर अहमद खान म्हणाले, राज्याच्या भल्यासाठी सिद्धरामय्या २०२३ मध्ये मुख्यमंत्री व्हावेत अशी लोकांची इच्छा आहे. यावर मी माझे मत मांडले आहे. परंतु न्याय देणारे आम्ही कोण? असा सवाल उपस्थित करत आमच्या नेत्या या सोनिया गांधी आहेत. असे जमीर अहमद खान म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानात परवानगी दिली आहे, म्हणून मी माझे मत व्यक्त केले, असे जमीर अहमद म्हणाले. प्रत्येकाने तोंड बंद ठेवून काम करावे, या डीकेशींच्या विधानावर देखील या बैठकीत प्रतिक्रिया देण्यात आली. जमीर अहमद यांनी डीकेशींच्या विधानावर अनेक सवाल उपस्थित केले असून प्रत्येकाला आशा असते. जनतेचाही आशा आहे. आणि आशा व्यक्त करणे हे चुकीचे नसल्याचे जमीर अहमद खान म्हणाले. मुस्लिमांनाही संधी मिळावी, आपल्यालाही मुख्यमंत्री होण्याची आशा आहे. लोकसंख्येनुसार १५ टक्के आपली संख्या असल्याचेही जमीर अहमद खान म्हणाले.

यावेळी आमदार सतीश जारकीहोळी यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ३ ऑगस्ट रोजी सिद्धरामय्या यांच्या वाढदिवसानिमित्त दावणगेरे येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. माजी मुख्यमंत्री, नेते सिद्धरामय्या यांचा जन्मदिवस साजरा करण्यात येणार असून बेंगळूरहून केवळ आपल्या आवाहनानुसार जमीर अहमद बैठकीसाठी आले असल्याचे जारकीहोळी म्हणाले. जमीर अहमद हे आपल्या पक्षातील एक सरविच्छ नेते आहेत. त्यांचा योग्यप्रकारे पक्षासाठी वापर व्हावा, ते आपल्या पक्षासाठी बाहुबलीप्रमाणे असल्याचे जारकीहोळी म्हणाले.

९ महिन्यांवर निवडणुका येऊन ठेपल्या असून आपण साऱ्यांनी एकत्रित येऊन काम करायला हवे, असे मतदेखील जारकीहोळी यांनी व्यक्त केले. जाफर शरीफ यांच्यानंतर जमीर अहमद या मुस्लिम समाजाच्या नेत्यांना संधी आहे. आयटी, ईडीच्या कारवाया झाल्या तर आपल्यासहीत पक्षदेखील त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगत आगामी काळात नक्कीच अच्छे दिन येतील, असे जारकीहोळी म्हणाले.

या सभेला सेट बंधूंची मात्र अनुपस्थिती होती. या बैठकीत आमदार महांतेश कौजलगी, नगरसेवक अजीम पटवेगार, अल्पसंख्यांक नेते सी के एस नजीर, मौलाना सलीम, अरविंद दलवाई, माजी आमदार रमेश कुडची, राजा सलीम, सय्यद मन्सूर, मुफ्ती मंजूर आलम आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: