Belagavi

‘शहीदोंकों शत शत नमन’ अभिवादन कार्यक्रम

Share

२५ कर्नाटक बटालियन एनसीसीच्या ग्रुपच्या वतीने बेळगावमधील जाधव नगर येथील एनसीसी कॅम्पमध्ये ‘शहीदोंकों शत शत नमन’ अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

स्वातंत्रोत्तर काळात विविध युद्धात सहभागी झालेल्या पुरस्कारप्राप्त सैन्यासाठी सदर कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. शत शत नमन कार्यक्रम हा स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाच्यानिमित्ताने अमृत महोत्सव अंतर्गत कार्यक्रमाचा हा भाग आहे. कार्यक्रमात आसपास परिसरातील एनओके पुरस्कार प्राप्त यात सहभागी झाले होते. राष्ट्राच्या प्रतिष्ठेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल कौतुकाचे प्रतीक म्हणून शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कुटुंबियांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात येते,

ग्रुप कमांडर कर्नल विनायक जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ग्रुप कमांडर यांच्या नेतृत्वाखाली पुरस्कार प्राप्त शहिदांच्या त्यागाचे आणि बलिदानाचे स्मरण करून अभिवादन करण्यात आले. यासाठी कुटुंबीयांची साथ आणि पाठिंबा देखील महत्वाचा असल्याचे या कार्यक्रमात कुटुंबियांना देखील सन्मानित करण्यात आले. ‘शहीदोंकों शत शत नमन’ अशा घोषणा देण्यात आल्या.

Tags: