Banglore

पहिले मुख्यमंत्री के. सी. रेड्डी यांची १२० वी जयंती

Share

माजी मुख्यमंत्री के. सी. रेड्डी यांच्या १२०व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज विधानसौधमधील त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज, गुरुवारी माजी मुख्यमंत्री दिवंगत के. सी. रेड्डी यांच्या १२०व्या जयंतीनिमित्त विधानसौधमधील त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, कर्नाटकचे पहिले मुख्यमंत्री के. सी. रेड्डी यांची १२०वी जयंती आज साजरी करण्यात येत आहे. स्वातंत्र्यानंतर राज्याचे पहिले म्हणून रेड्डी यांनी राज्याच्या विकासाचा पाया घातला. केंद्र सरकारचे उद्योग कर्नाटकात आणले. आयटीबीटी, आधुनिक बेंगळूर आणि कर्नाटकाच्या विकासाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. ते सगळ्यांकडे समानतेने पहात.

त्यांचे आदर्श सर्वांनी पाळण्याची गरज आहे असे बोम्मई म्हणाले.  कामगार मंत्री शिवराम हेब्बार, राज्य सरकारचे मुख्य सचिव पी रविकुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव  मंजुनाथ प्रसाद आणि के. सी. रेड्डी यांच्या नातेवाईक कविता रेड्डी आदी उपस्थित होते.

 

Tags: