Banglore

मुख्यमंत्र्यांचा आजपासून ३ दिवस राज्यात दौरा

Share

राज्यातील विविध विकासकामांचे उदघाटन करण्यासाठी आणि पक्षाच्या कार्क्रमात सहभागी होण्यासाठी आजपासून दिवस राज्यात दौरा करणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.

बेंगळुरातील आरटी नगरातील आपल्या निवासस्थानी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, आजपासून ३ दिवस राज्यात ठिकठिकाणी दौरा करणार आहे. आज शिमोगा आणि चिक्कमंगळूर जिल्ह्याला भेट देणार आहे. शृंगेरी आणि हरिहरलाही जाणार आहे. शिमोगा येथे पक्षाच्या विविध कार्यक्रमांत भाग घेणार आहे. उद्या गुलबर्ग्याला जाणार आहे. तेथे पक्षाचे आणि विकासकामांचे उदघाटन कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर मुधोळ येथे २ पाणी योजनांची कोनशिला बसविणार आहे. यातील एक योजना गोविंद कारजोळ यांच्या व दुसरी योजना सिद्दरामय्या यांच्या मतदार संघातील आहे. नेत्यांनी बोलावल्यास दिल्लीला जाणार आहे. मात्र राज्यातील विविध विकासकामांना प्राधान्य देण्यात येत आहे असे बोम्मई म्हणाले. बाईट

हुबळी दंगलीवरील प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, या दंगलीचा तपास वेगाने सुरु आहे. ज्यांनी चूक केलीय त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. पोलीस ठाण्यावर हल्ला करणे आणि पोलीस वाहनांचे नुकसान करणे हा अक्षम्य अपराध आहे. यावर निश्चितच कठोर कारवाई करण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले.

Tags: