नवीन वर्षाच्या पहिल्या दिनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज बेंगळुरातील तिरुपती देवस्थानला भेट देऊन विशेष पूजा केली. त्याचप्रमाणे राज्यातील जनतेला नव्या वर्षाच्या शुभेच्छादेखील त्यांनी दिल्या आहेत.

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आज मुख्यमंत्री बोम्मई यांनी आज बेंगळुरातील वैयालिकावल भागातील तृप्ती देवस्थानात जाऊन विशेष पूजा केली. यावेळी त्यांच्यासमवेत मंत्री मुनिरत्न, देवस्थानचे संचालक शशिधर आदी उपस्थित होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेत पुष्पगुच्छ देऊन नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना बोम्मई यांनी, राज्यातील जनतेला नवीन वर्ष सुख-समाधान देवो, अशी प्रार्थना देवाकडे केल्याचे सांगितले.

त्यानंतर मुख्यमंत्री बोम्मई यांनी वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्य सचिव पी. रवीकुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मंजुनाथ प्रसाद, पोलीस महासंचालक प्रवीण सूद आदी अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments