Vijayapura

विजापूरमध्ये जाहीर प्रचाराची सांगता ; कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याच्या अनेक तक्रारी

Share

विजापूर जिल्ह्यातील सिंदगी पोटनिवडणुकीच्या जाहीर प्रचाराची सांगता झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज विजापूर जिल्ह्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. निवडणुकीसंदर्भात ५२ तक्रारी दाखल झाल्या असून यातील अधिक तक्रारी कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दाखल झाल्या आहेत.

विजापूरमध्ये पोटनिवडणुकीसंदर्भात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी पी. सुनीलकुमार यांनी सदर माहिती दिली असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक तक्रारी दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले. एकूण ५२ प्रकारणांपैकी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यासंदर्भात ८, आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी ९ आणि गटाने गोंधळ माजविण्यावरून १ प्रकरण दाखल झाले आहे अशी माहिती त्यांनी दिली. एकूण २४ प्रकरणांवर एफआयआर दाखल करण्यात आली असून महसूल विभागांतर्गत ६१ प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. पोलीस प्रकाराइन १४, तसेच इतर ३ यासह ३८ प्रकरणे दाखल झाली आहेत. २७७ लिटर मद्य, ४ किलो गांजा, २ बाईक आणि १ कार जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

मतदान आणि मतमोजणीसाठी नियुक्ती करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून कोणत्याही प्रकारची रोगाची लक्षणे नसल्याचे तसेच कोविड चे दोन्ही डोस झाल्याची खात्री करून घेण्यात आली आहे. कोविड पॉझिटिव्ह प्रकरणांवर लक्ष ठेवण्यात आले असून या मतदार संघात ६० जणांचे लसीकरण पूर्ण झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

सिंदगी मतदार संघात एकूण २३४५८४ मतदार आहेत. यापैकी १२०८४४ पुरुष, ११३५६१ महिला आणि इतर ३२ अशी मतदार संख्या आहे. या निवडणुकीसाठी एकूण २३१ मतकेंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. तर ३ चेकपोस्ट, १३०८ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. 2 नोव्हेंबर रोजी मतमोजणी करण्यात येणार असल्याची माहितीही या पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेला जिल्हास्तरीय विभागातील अनेक अधिकारी उपस्थित होते.

Tags: