कोविड मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अनेक सण, समारंभ, जत्रा – यात्रा, मिरवणूक आणि सार्वजनिक कार्यक्रमावर निर्बंध लादण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्योत्सवावरदेखील काही निर्बंध लादण्यात आले असून १ नोव्हेम्बर रोजी बेळगावमध्ये राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर भव्य मिरवणुकीसाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी बेळगावमधील कन्नड संघटनांनी केली आहे.

सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेल्या करवे सहित अनेक विविध कन्नड संघटनांच्या वतीने राज्योत्सवासंदर्भात विविध मागण्या करत घोषणाबाजी केली असून राज्योत्सव मिरवणूक मोठ्या आणि भव्य प्रमाणात साजरी करण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

यावेळी करवे राज्य संचालक महादेव तळवार बोलताना म्हणाले कि, बेळगावमध्ये राज्योत्सव साजरा करण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारचे अर्धे-वेढे न घेता परवानगी द्यावी. मिरणवूक काढण्यात आलीच पाहिजे. डॉल्बीसह मोठ्या आणि भव्य प्रमाणात बेळगावमध्ये राज्योत्सव साजरा करण्यात आला पाहिजे. गेल्या दोन वर्षांपासून कोविड पार्श्वभूमीमुळे राज्योत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्यात आला नाही. परंतु यंदा राज्योत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्यात यावा, असा कन्नड भाषिकांचा मानस आहे. यासंदर्भात २२ ऑक्टोबरपर्यंत प्रशासनाला वेळ देण्यात आला असून संपूर्ण परवानगी न दिल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महादेव तळवार यांनी दिलाय.
यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात कन्नड संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी कन्नड संघटना क्रिया समिती जिल्हाध्यक्ष अशोक चंदरगी, करवे जिल्हाध्यक्ष दीपक गुडगनट्टी, कस्तुरी भावी यांच्यासह इतर कन्नड कार्यकर्ते उपस्थित होते. एकंदर कर्नाटक राज्योत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्यासाठी कन्नड संघटना सज्ज झाल्या असून जिल्हा प्रशासन या साऱ्या गोष्टींना परवानगी देईल का? याची प्रतीक्षा कन्नड भाषिकांना आहे.


Recent Comments