बेळगाव तालुक्यातील काकती गावात सोमवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ५० दात्यांनी रक्तदान केले.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण खाते, प्राथमिक आरोग्य केंद्र, वंटमुरी आणि काकती ग्राम पंचायतीच्या वतीने सोमवारी काकती येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी ५०हुन अधिकजणांनी रक्तदान करून इतरांसमोर आदर्श घालून दिला. यावेळी माजी जिप सदस्य यल्लाप्पा कोळेकर, ग्राम पंचायत सदस्य गजानन गव्हाणे, मनोहर शेखरगोळ, डॉ. आर. जी. पाटील, लॅब टेक्निशियन शांताराम जांगडे, आरोग्य खाते कर्मचारी संगमेष गोगी, रवी गुरुवण्णावर, लक्ष्मी अंबी, सुनंदा तसेच आशा-अंगणवाडी कार्यकर्त्या उपस्थित होत्या.



Recent Comments