विजापूर जिल्ह्यात भूकंपाचे सत्र सुरूच असून काल विजापूर शहरापाठोपाठ आज कोल्हार तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवल्याने गावकऱ्यांत भीती पसरली आहे.

होय, दुष्काळापाठोपाठच विजापूर जिल्ह्याची आता भूकंप बनत चालली आहे. विजापूर जिल्ह्यात महिना-दीड महिन्यांच्या काळात अनेक तालुक्यांत भूकंपाची नोंद करण्यात आली आहे. शनिवारी सकाळीही विजापूर शहरात भूकंपाचे धक्के बसले होते. त्या पाठोपाठ कोल्हार तालुक्यातील मसुती, मलघान तसेच आसपासच्या गावात आज रविवारी सकाळी ५.१५ आणि ७.१५ च्या दरम्यान भूकंपाचे धक्के जाणवले.

एकापाठोपाठ एक बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे गावकऱ्यांत मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे. या भूकंपामुळे काही अनर्थ तर घडणार नाही ना? यापासून कधी सुटका मिळणार? अशी चर्चा ग्रामस्थांच्या सुरु आहे. जिल्हा प्रशासनाकडून यावर स्पष्टीकरण देऊन ग्रामस्थांतील भीती दूर करण्याची गरज आहे.


Recent Comments