Belagavi

मनपा उपायुक्तपदी भाग्यश्री गुंजेरी यांची नियुक्ती

Share

बेळगाव महानगर पालिकेच्या नूतन उपायुक्त म्हणून भाग्यश्री गजानन गुंजेरी यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला.

गेले अनेक महिने बेळगाव महापालिकेचे उपायुक्त पद रिक्तच होते. अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांच्याकडे या पदाचा प्रभार होता. त्यानंतर आता सरकारने भाग्यश्री गजानन गुंजेरी यांची नियुक्ती करून तसा आदेश बजावला आहे. गुंजेरी यांच्या या नियुक्तीमुळे बेळगाव पालिकेला पूर्णवेळ उपायुक्त मिळाला आहे.

 

 

 

Tags: