बेळगावातील टिळकवाडीतील लेले अर्थात सुभाषचंद्र ग्राऊंडमागे रस्त्याशेजारील एका अपार्टमेंटच्या बांधकामावेळी अंडरग्राऊंड ड्रेनेजवाहिनी बुजविण्यात आली होती. त्यामुळे लोकांना त्रास होत असल्याने लोकांच्या तक्रारीवरून इन न्यूजने याबाबतचे वृत्त प्रसारित केले होते. त्याची दखल घेऊन येथे स्वच्छता करण्यात आली आहे.

टिळकवाडीतील लेले अर्थात सुभाषचंद्र ग्राऊंडमागे रस्त्याशेजारील एका अपार्टमेंटच्या बांधकामावेळी समोरील अंडरग्राऊंड ड्रेनेजवाहिनी बुजविण्यात आली होती. त्यामुळे लोकांना त्रास होत होता. फ्लो

याबाबत रहिवाशांनी पालिका अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही काही उपयोग झाला नव्हता. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी इन न्यूजशी संपर्क साधून माहिती दिली होती. त्यावरून इन न्यूजने वृत्त प्रसारित केले होते. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या महानगरपालिका अधिकाऱ्यांनी अपार्टमेंट बांधकाम मालकाला ड्रेनेज वाहिनी खुली करून स्वच्छ करण्यास सांगितले होते. त्यानुसार मालकाने ड्रेनेज वाहिनी स्वच्छ करवून घेतली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी इन न्यूजचे आभार मानले आहेत. फ्लो


Recent Comments