Belagavi

११ दिवसांच्या गणेशोत्सवासाठी मुख्यमंत्री अनुकूल : आ. अभय पाटील

Share

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेऊन बेळगाव पालिकेचा निकाल, गणेशोत्सव आणि शहराच्या विकासावर चर्चा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे अशी माहिती . अभय पाटील यांनी दिली आहे.

बेंगळूरमध्ये प्रसारमाध्यमांसाठी एक व्हिडिओ संदेश जारी करून आ. अभय पाटील यांनी सांगितले की, गणेशोत्सव ११ दिवस साजरा करण्यास परवानगी देण्याची मंडळांची मागणी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली. त्यावर ११ दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याचप्रमाणे बेळगावात ११ दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला जावा असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी दुपारपर्यंत आदेश जारी करणार आहेत असे आ. अभय पाटील म्हणाले.

बेळगाव मनपावर निवडून आलेले भाजपचे ३५ नगरसेवक सोमवारी बेंगळुरातील भाजप राज्य कचेरीला भेट देणार आहेत. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांना विधानसौधमध्ये त्यांची भेट घडविण्यासाठी वेळ मागितला आहे असेही आ. अभय पाटील यांनी सांगितले.

एकंदर, बेळगाव मनपावर भाजपची सत्ता येण्यात प्रमुख भूमिका बजावलेल्या आ. अभय पाटील यांनी निवडणुकीतील कामगिरीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला आहे.

 

 

 

Tags: